एअर इंडियाची अवस्था किंगफिशर सारखी होऊ देणार नाही अशी ग्वाही नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी दिली आहे. विजय मल्ल्या यांची किंगफिशर कंपनी बंद पडली आणि नंतर बँकांना हजारो कोटींचा चुना लावून मल्ल्याही इंग्लंडला पळून गेले. एअर इंडियामध्ये काम करणाऱ्या कुणाचीही नोकरी घालवण्या ची आमची इच्छा नसल्याचे ही त्यांनी म्हटले आहे. एअर इंडियाची निर्गुंतवणूक करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे राजू यांनी लोकसभेत बोलताना सांगितले. ‘कुणाचीही नोकरी जावी असं कुणालाही वाटत नाही.एअर इंडियाची निर्गुंतवणूक करण्याचे निश्चित असले तरी किती हिस्सा विकायचा, कसा विकायचा याबाबत महत्त्वाच्या गोष्टी ठरायच्या आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews